दिलासा – ब्युटी पार्लर आणि जीमवरील निर्बंधात शिथिलता
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात काही आवश्यक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानुसार शाळा कॉलेज हे 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत तर स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पार्क , प्राणी पक्षी संग्रहालय , पर्यटन् स्थळे, किल्ले हे बंद असणार आहेत तर मॉल व कॉम्प्लेक्स हे 50 टक्के मर्यादेत सुरु असणार आहेत , राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी हे आदेश काढले असून त्याची उद्यापसुन् अंमलबजावणी सुरु करण्यास सांगितले आहे.
सलून,खासगी कार्यालय, पिक्चर थीयटर हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील तर रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. शाळा सोबत कोचिंग क्लास पण 15 फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहेत. लग्न सोहळ्यास 50 लोकांची उपस्तीथी, अंत्यविधी 20 तर समाजिक,धार्मिक,राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांस 50 लोकांची उपस्तीथी बंधनकारक असणार आहे.रेस्टोरेंट,नाट्यगृह हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
प्रवाशी व्यक्तिक वाहनाने वाहतूक सुरु राहील तसेच पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरु राहील मात्र लसीकरण बंधनकारक असणार आहे. मंदिरे, धार्मिक स्थळे सुरु राहतील.