खापर सेमी इंग्रजीवर – जिल्हा परिषद शाळांचा पट 27 हजाराने कमी झाला
सर्वेक्षण 2018 ला तर निर्णय 4 वर्षानंतर – अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे काय ?
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील 1 हजार 83 शाळेत सरसकट सुरु असलेले सेमी इंग्रजी बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेल्यानंतर ग्रामीण भागात पालकात नाराजीचा सुरु आहे. जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी प्रवेश घेऊन शिक्षण घ्यावे यासाठी वाढत्या स्पर्धेला अनुसरून सेमी इंग्रजी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळेतील पट वाढला नसून तो उलट कमी झाल्याचा दावा लेखी अहवालात केला आहे. पट कमी होण्यास अनेक कारणे असली तरी त्याचे संपूर्ण खापर सेमी इंग्रजीवर फोडण्यात आले आहे. जर 27 हजार विद्यार्थी कमी झाले असतील तर मग त्या तुलनेत नियमाप्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेळोवेळी केले का ? हा प्रश्न समोर आला आहे. अहवालानुसार अतिरिक्त शिक्षकांचा निर्णय घेणे गरजेचे आहे.
सेमी इंग्रजीमुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या बाबत काय स्तिथी आहे याची विचारणा जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर लेखी अहवालात याचा उहापोह आकडेवारीसह करण्यात आला आहे. यु डायस डाटा नुसार सन 2011-12 ते 2019-20 चे अवलोकन केले असता 2011 मध्ये 1 ली ते 8 वी जिल्हा परिषद शाळांचा पट म्हणजे विद्यार्थी संख्या 1 लाख 26 हजार 791 होता तो 2019-20 या वर्षी 99 हजार 599 इतका झाला म्हणजे सेमी इंग्रजीमुळे पटसंख्या वाढली नसून 27 हजार 192 ने कमी झाली आहे.
सेमी इंग्रजी बंद करताना पालकांचे मत कुठेही ग्राह्य धरले नाही तर लोकप्रतिनिधी यांना साधी विचारपूस पण केली नाही. सेमी इंग्रजीसाठी 2012 ते 2019-20 या काळात एकदाही प्रशिक्षण दिले नाही तरी देखील शिक्षकांनी चांगल्या प्रकारे शिकविले व विद्यार्थी यांची प्रगती चांगली झाली ही बाब दुर्लक्षित करण्यात आली. 26 टक्के शिक्षक इंग्रजीतून स्पष्टीकरण देऊ शकतात. 28 टक्के शिक्षक हे इंग्रजीतून अध्यापन करतात हे कौतुकास्पद आहे. प्रशिक्षण दिले गेले असते तर यात आणखी सुधारणा झाली असती.
ज्या शाळांचा सर्व्ह करण्यात आला त्या शाळेत इतर विषय बाबत काय स्तिथी आहे हे पाहने गरजेचे होते मात्र आवश्यकतेनुसार व सोयीनुसार अर्थ काढून सेमी इंग्रजीवर अनेक बाबींचे खापर मोडण्यात आले. 2018 च्या अहवालावर व आकडेवारीवर निष्कर्ष काढत 2022 साली म्हणजे तब्बल 4 वर्षानंतर निर्णय घेण्यात आला आहे या 4 वर्षात अनेक शिक्षकांनी स्वसुधारणा केली आहे तर अनेक शिक्षकांनी पदवीधर पूर्ण करून प्रशासकीय लाभ घेतला आहे त्यामुळे 2018 सालचा अहवाल जुना ठरणारा आहे. 2018 ची स्तिथी 2022 ला नक्कीच बदललेली असणार.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात डायटच्या अहवालाचा दाखला घेतला आहे तो अहवाल 2018 सालीचा असून गुगल लिंक द्वारे सर्वेक्षण करून बनविला आहे. त्यात 4500 पैकी 2501 इतक्या शिक्षकांनी सहभाग नोंदवीला असे नमूद आहे त्यानुसार 90 टक्के शिक्षकांनी मातृभाषेतून शिक्षण असावे तर 10 टक्के शिक्षकांनी शिक्षण इंग्रजीत असावे असे म्हण्टले आहे.25 टक्के शिक्षकांचे आशय ज्ञान चांगले दिसून आले. 26 टक्के शिक्षक इंग्रजीतून स्पष्टीकरण देऊ शकतात. 28 टक्के शिक्षक हे इंग्रजीतून अध्यापन करतात.
2019 मध्ये डायटने सेमी इंग्रजी माध्यमातून अध्यापन केल्याने निदर्शनास आलेली फल निष्पत्ती अहवाल 30 एप्रिल 2020 लेखी सादर केला आहे. त्यात फक्त 20 टक्के विद्यार्थी यांना गणित व विज्ञान विषयाचे प्रश्न योग्य पद्धतीने लिहता आले. 25 टक्के विद्यार्थी यांना प्रश्न बरोबर वाचता आले, 18 टक्के विद्यार्थी यांना प्रश्न समजले. 12 टक्केना सोडविता आले. 15 टक्के विद्यार्थी यांचा अध्यापनानंतर प्रतिसाद चांगला दिसून आला.
चार्ट पाहावा