स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला पंढरपूर येथून अटक – भाविक महिलेवर बलात्काराचे प्रकरण
धाराशिव – समय सारथी
स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला पंढरपूर येथून भाविक महिलेवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने येरमाळा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी सापळा रचत पंढरपूरमधुन अटक केली. दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण आहे.
28 जुलै 2022 रोजी मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे सर्वेसर्वा स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात बसली असता महाराजांनी महिलेस प्रवचन हॉलच्या खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता यावेळी महाराजांनी घटनास्थळीवरून पळ काढला. त्याच दिवशी महिलेच्या तक्रारीवरून महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात अटक ही झाली होती मात्र त्यांची जामीनवर सुटका झाली आहे आता पुन्हा अटक केली आहे.
पीडित भाविक महिलेने अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली होती, न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ महाराज याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले त्यानुसार लोमटे महाराजाला अटक केली गेली आहे.