धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की, सोलर कंपन्याची मनमानी पाहायला मिळत असुन गायरान जमिनी, पाटबंधारे विभागासह अन्य विभागानी भुसंपादित केलेल्या क्षेत्रावर अतिक्रमण करीत त्याचा सर्रास वापर प्रकल्प, त्याला जाण्यासाठी लागणारे रस्ते व इतर कामासाठी होत आहे. अकृषी परवानगी नसताना कंपन्या काम करीत असुन अतिक्रमण ही त्याची नित्याची बाब झाले आहे, या सगळ्या बाबीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असुन कारवाईची मागणी होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, भुम, परंडा या तालुक्यात पवनचक्की व सोलार ऊर्जेचे मोठे काम सुरु आहे त्याला संरक्षण देण्याची नावाखाली दलाल व गुंडाची टोळी शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करीत आहेत.
वाशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश शिंदे व युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अवधूत क्षीरसागर यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष, पवनचक्कीची कोणतीही माहिती तहसीलदार स्तरावर उपलब्ध नसल्याचे माहितीच्या अधिकारात कळवून प्रशासनाने हात वर केले आहेत. वाशी तालुक्यात जे पवन चक्की प्रकल्प उभा राहणार आहेत त्या करिता जमीनी भाडेतत्वावर घेतल्या जात आहेत. त्या जमीनीचे रजिस्टेश करुन घेतात व ते अग्रीमेंट शेतकऱ्यांच्या कसल्याही हितावचे नुसून शेतकऱ्यांची निव्वळ फसवणुक होत आहे. त्या अग्रीमेंट मध्ये 28 वर्षे 11 महिने असा उल्लेख केला जात आहे. परंतू ज्या जमीनी संपादीत क्षेत्रापेक्षा अधिक वापरल्या जात आहेत.
तुळजापूर तालुक्याच्या बारुळ गावामध्ये सचिन ठोंबरे या शेतकऱ्याला पवनचक्कीच्या गुत्तेदार आणि गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर मेसाई जवळगा सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गाडीवर पेट्रोल, अंडे व दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बारूळ येथे जेएसडब्लू कंपनीला पवनचक्कीसाठी गट न 81 मधील 20 गुंठे जमीन भाडेतत्वावर दिलेली आहे. पवनचक्कीचे लोक 20 गुंठे जमीन न वापरता 30 ते 35 गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले. शेतातील लिंबाचे,बाभळीचे,बोराचे झाडे हे आरोपीनी कुठलीही परवानगी न घेता तोडत आहेत. जिल्ह्यात पवनचक्की माफिया बोकाळला असुन मुंबई पुणे येथील 3-4 गँग सक्रीय आहेत. बाउन्सर, काळ्या गाड्या, बंदुकबाजी असे दहशतीचे प्रकार वाढले आहेत.