धाराशिव – समय सारथी
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केशव सावंत व धनु सावंत तुमचा पण संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल असे या पत्रात नमुद केले असुन त्या पत्रासोबत 100 रुपयाची नोट देखील जोडली आहे. पत्रातील मजकूर हा पेन्सिलने स्केच करुन लिहला आहे. धनंजय व केशव सावंत हे वाशी, सोनारी व ढोकी येथील साखर कारखान्याचा कारभार सांभाळतात. यापुर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती त्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्याच्या पाठीमागील सूत्रधाराचा शोध लागलेला नसतानाच ह्या धमकीच्या लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. सावंत बंधु कोणाच्या रडारावर आहेत हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. भुम, परंडा,वाशी, तुळजापूर, धाराशिव भागासह जिल्ह्यातील पवनचक्की माफिया बोकाळला असुन मुंबई पुणे येथील 3-4 गँग सक्रीय आहेत. बाउन्सर, काळ्या गाड्या, बंदुकबाजी असे प्रकार वाढले आहेत.