धाराशिव – समय सारथी
एका 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 21 वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना घडली असुन पोलिसांनी वृंदावन कॉलनी, आनंद नगर, धाराशिव येथील आरोपी निश्चल मधुकर बोंदर याला अटक केली आहे. आरोपीने ओळखीचा फायदा घेत घरी खेळण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, मुलीला पोटदुखीचा त्रास झाल्याने तिने ही घटना आईला सांगितली त्यानंतर हा प्रकार उघड झाला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीला अटक केली आहे. आरोपी निश्चलने त्याच्या रूममध्ये दुषकृत्य केल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने घटना उघड करण्याऐवजी पिडीत मुलीला तीच्या घरी नेहून सोडले व कोणास काहीही सांगितले नाही. एक प्रकारे आरोपी मुलाच्या कृत्यावर आईने पांघरून घालण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी म्हणावे लागेल. भारतीय न्याय संहिता 64,64(2)(1), 64(2),बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जाधव हे करीत आहेत. आरोपीला 7 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.