कळंब – समय सारथी
अडीच वर्ष सोडली तर उर्वरित काळात भाजपचे सरकार होते, त्यांनी शेतकऱ्यांचे हाल केले, सगळी धोरणे शेतकरी विरोधी आहेत. सोयाबीनचे भाव कोसळले असुन खत, बियाने याचे भाव वाढले असुन नांगरणी व इतर खर्च परवडणारा नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. किमान आधारभुत खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीने सोयाबीन विकावे लागत आहे. सरकारने सोयाबीनची पेंड सुद्धा आयात केली त्यामुळे भाव कोसळले व 9 हजारचे सोयाबीन 4 हजार रुपयावर आले. अनेक शेतकऱ्यांच्या घरात 3 वर्षापुर्वीचे सोयाबीन शिल्लक आहे. दुधाचीही स्थिती तशीच आहे. भाव कमी झाले असुन 30 टक्के दुध व खवा भेसळयुक्त आहे त्यावर कारवाई केली जात नाही, दुध भेसळवर नियंत्रण ठेवले तर भाव चांगला मिळाला असता. कांद्याचे भाव वाढल्यावर निर्यात बंदी घालायची हे धोरण स्वीकारले. गुजरातला पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवली मात्र महाराष्ट्रमधील लाल कांदाची उठवली नाही. जाती जातीत धर्मा धर्मात भेदभाव केला असा आरोप केला.
महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील माळकरंजा येथे जात नागरिक व मतदार यांच्याशी संवाद साधला आणि विकास कामांचा आढावा सांगितला. यावेळी माजी तालुका प्रमुख रामलिंग आव्हाड, तानाजी सारंग, नितीन भोसले, रजाभाऊ लोमटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. अटलबिहारी यांच्या विचाराची भाजप कधीच संपली असुन सुडाचे राजकारण करणारी फडणवीस यांची भाजप कार्यरत आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होत आहे. अशी टीका आव्हाड यांनी केली. कळंब हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मात्र धनुष्यबाण चोरला आहे, मशाल हे चिन्ह असल्याने कैलास पाटील यांना निवडुन द्यावे असे आवाहन आव्हाड यांनी केले.
लाडकी बहीण नसुन लाडकी खुर्ची अशी योजना लोकसभेच्या निकालानंतर खुर्ची धोक्यात आल्यावर सुरु केली. उद्धव ठाकरे हे शब्द पाळणारे नेतृत्व आहेत, 3 लाख पर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असुन ते सत्ता आल्यावर कर्जमाफी करतील असे आमदार पाटील म्हणाले. शेतकरी, विद्यार्थी यांच्या विरोधी सरकार असुन अनेक उद्योग हे गुजरातला नेले आहेत ते महाराष्ट्राचा द्वेष करतात. माळकरंजा गावात अंगणवाडी, स्मशानभुमी शेड, जिल्हा परिषद शाळेला कंपाउंड केले, डिपी मंजुर केल्या आहेत असे सांगत विकास कामांची माहिती दिली
.