बेरोजगार तरुणांना मिळाले रोजगार तर स्थानिक उद्योग सुरु, विक्रमी भाव
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी भैरवनाथ शुगर वर्क्सच्या माध्यमातून 3 साखर कारखाने सुरु केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हक्काच्या या कारखान्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर जावे लागत नाही, शिवाय चांगला भाव मिळत असल्याने हे कारखाने शेतकऱ्यांसाठी धनलक्ष्मी ठरत आहेत. या कारखान्यामुळे बेरोजगार तरुण व कामगार यांना काम मिळाले आहे तर कारखाना परिसरात स्थानिक छोटे उद्योग सुरु झाले आहेत. पालकमंत्री डॉ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर सोनारी परंडा, भैरवनाथ शुगर शिवशक्ती वाशी व तेरणा शेतकरी साखर कारखाना ढोकी असे 3 कारखाने धाराशिव जिल्ह्यात यशस्वीपणे सुरु आहेत. डॉ सावंत यांच बंधु प्रा शिवाजीराव सावंत, पुतणे धनंजय सावंत, केशव सावंत हे याची धुरा सांभाळत आहेत.
शिवशक्ती व तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना पुन्हा l सुरु झाल्याने या भागाला गतवैभव प्राप्त झाले असुन या भागातील शेतकर्यासाठी धनलक्ष्मी ठरला आहे. तेरणा कारखान्याने तर पहिल्या हंगामात 3 लाख 12 हजार 878 मेट्रिक टन गाळप केले असुन 5 हजार 272 शेतकरी यांना 88 कोटी 38 लाख 82 हजार रुपयांचे ऊसबील दिले आहे.तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सन 2012 पासून गाळपा अभावी बंद होता. हा कारखाना बंद असल्यामुळे भैरवनाथ शुगर वर्कसचे सर्वासर्वे प्रा डॉ सावंत यांच्या भैरवनाथ शुगरने 25 वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांनी युध्द पातळीवर काम करुन अवघ्या 6 महिन्यांत कारखाना गाळपास सज्ज केला. शेतकरी व सभासदांनी कारखान्यास ऊस दिल्यामुळे भैरवनाथ शुगरने तब्बल 3 लाख 12 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून शेतकर्यांना 2 हजार 825 रुपये इतका विक्रमी भाव दिला. हा ऊस दर धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक देणारा भैरवनाथ शुगर नंबर वन ठरला आहे.
गाळप केलेल्या संपूर्ण उसाचे बिल पूर्णपणे शेतकर्यांना दिले आहे. हा कारखाना भैरवनाथ शुगरच्या पुढाकारातून सुरु झाल्यामुळे येथील शेतकर्यांचा ऊस वेळेवर गाळपासाठी गेला. विशेष म्हणजे कारखाना परिसरातील उद्योग व व्यवसायाला चालना मिळून व्यापार वाढला तर सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळून रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सोनारी, शिवशक्ती व तेरणा पट्टयातील ऊस उत्पादक सभासद व व्यापार्यांमधून सावंत परिवाराचे विशेष कौतुक केले जात आहे.