आरोग्यक्रांती – धाराशिव जिल्ह्याला 1 हजार कोटींचा निधी, श्रेणीवर्धनसह दर्जा सुधारला
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी आरोग्य विभागात 24 महिन्यात 42 निर्णय घेऊन अमुलाग्र बदल केल्याने लाखों रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे. आरोग्य विभागात न भुतो न भविष्यती असे निर्णय घेल्याने लाखो रुग्णांचे जीव वाचले आहेत तर माता मृत्यु, बाल मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सुरु झाल्याने दर्जा सुधारला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा वाशी या दुर्गम भागात आरोग्य संस्थांच्या श्रेणीवर्धनमुळे उपजिल्हा व स्त्री रुग्णालय मंजुर झाले आहेत. राज्यातील जनतेला सुदृढ आरोग्याचा अधिकार देणारा आरोग्य हक्क कायदा लवकरच आणणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.राज्यातील जनतेला सुदृढ आरोग्याचा अधिकार देणारा आरोग्य हक्क कायदा लवकरच आणणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.
मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी आरोग्य सेवाचा वसा घेत निरोगी महाराष्ट्राचा संकल्प केला आणि तो पुर्ण करुन दाखविले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरूक पालक सुदृढ बालक, गर्भवती माता व नवजात बालकांसाठी वातसल्य योजना राबविली यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले. व्यसनमुक्ती, कर्करोगावरील उपचारासाठी 34 जिल्ह्यात केमोथेरपी, 4 ठिकाणी रेडीओ थेरपी केंद्र सुरु केले. हृदयरोगासाठी 16 ठिकाणी कार्डीयाक कॅथ लॅब, 22 एमआरआय, 495 ठिकाणी डायलिसीस सुविधा, लिथोट्रिप्सी, मनोरुग्णालय सुरु केले. प्रत्येक जिल्ह्यात हिमोफिलिया डे सेंटर सुरु केले.
निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे अंतर्गत 3 कोटी पेक्षा अधिक पुरुषांची यापासणी केली मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अंतर्गत 1 लाखापेक्षा अधिक शस्त्रक्रिया, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापना, आयुष रुग्णालय, राज्यात 347 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तर 700 ठिकाणी आपला दवाखाना, सुंदर माझा दवाखाना, 15 आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले. वैद्यकीय अधिकारी यांच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे बदल्या, 10 हजार पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती केली. महाआरोग्य शिबीर, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी सुरु करुन सलग 2 वर्ष इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे विमाकवच 1.5 लाखावरून 5 लाख केले.रेशनकार्डची अट रद्द केली. 5 कोटीपेक्षा अधिक आयुष्यमान भारत नोंदणी, सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट 23 पासुन मोफत उपचार सुरु केले. आशा सेविकांच्या मोबदल्यात 5 हजारांची वाढ करुन 13 हजार प्रतिमहिना मानधन केले. आशा गटप्रवर्तक मोबदल्यात 4 हजार वाढ करुन 19 हजार 975 केले. 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचारी यांना मंजुर समकक्ष पदावर सामावून घेण्यास मंत्रीमंडळाची मान्यता घेतली.
धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांसाठी 24 महिन्यात तब्बल 1 हजार कोटींपेक्षा अधिक विक्रमी निधी मंत्री सावंत यांनी दिला. फिरते मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु झाल्याने ग्रामीण भागात आरोग्य तपासणी व उपचार झाले. तेरखेडा येथे 100 खाटांचे उपजिल्हारुग्णालय, परंडा तालुक्यातील पाचपिंपळा, चिंचपुर खु, ढगपिंपरी, घारगाव येथे विशेष बाब म्हणून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर केले. भुम तालुक्यातील नागेवाडी व घाटनांदूर येथे विशेष बाब म्हणुन नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर केले. भुम येथे 60 बेडचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजुर करण्यात आले असुन अंद्रूड येथे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. भुम रुग्णालयात डायलिसीस केंद्र व सोनोग्राफी सुरु केली. धाराशिव येथे नवीन 500 खाटाचे जिल्हा रुग्णालय, कॅथ लॅब, फिरता दवाखाना, मिशन आनंदी, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी तालुक्यासह तुळजापूरसह अन्य ठिकाणी महाआरोग्य शिबीर संपन्न झाली आहेत.