धाराशिव – समय सारथी
राज्याच्या आरोग्य विभागाच्या विविध पदाच्या भरतीत पारदर्शक कारभार पहायला मिळाला असुन डॉक्टर यांच्या पदासह अन्य भरती करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवार यांना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महायुती सरकारच्या काळात आरोग्य विभागात डॉ सावंत यांनी अमुलाग्र बदल केले असुन न भुतो न भविष्याती अशी कामे व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया बरोबरच ऑनलाईन बदली प्रक्रिया ही आरोग्यमंत्री यांच्या आदेशाने आरोग्य विभागाने यशस्वीरित्या राबविली.
आज महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ पदाची भरती प्रक्रिया पार पडली, 283 जागा रिक्त होत्या त्यासाठी 22 हजार अर्ज आले त्यातून बीएएमएस पदाची भरती केली गेली व त्यांच्या नेमणूकांचे आदेश त्यांना देण्यात आले. आजवर ज्या भरती प्रक्रिया राबवली गेली त्यात कोणत्याही प्रकारचा घोटाळा, पेपर फुटी झाली आहे. 1 हजार 456 डॉ यांची भरती जानेवारी महिन्यात करण्यात आली. यासाठी आरोग्यमंत्री सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी यांचे अभिनंदन करीत नवीन डॉक्टर यांना शुभेच्छा दिल्या.
283 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन नियुक्तीचे आदेश प्रदान
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील 283 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी बीएएमएस शैक्षणिक पात्रता प्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते. याबाबत 31 जानेवारी 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आज सदर परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून 283 उमेदवारांना ऑनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी आयबीपीएस संस्थेमार्फत 5 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात आली. नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.