मग मरण आले तरी बेहत्तर, आम्ही सारे भाग्य समजू – एकनाथ शिंदे यांची पोस्ट
उस्मानाबाद – समय सारथी
मरण आले तरी बेहत्तर, आम्ही सारे भाग्य समजू अशी भावनिक पोस्ट एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू अशी भावनिक साद घालणारी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केली आहे. शिवसेनेतून जवळपास 40 च्या वर आमदार मंत्री हे फुटले असून त्यांनी हिंदुत्वचा मुद्दा व राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होणारा त्रास, खच्चीकरण मुद्दा पुढे करीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली आहे मात्र त्यांच्या या मागणीची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही उलट राज्यभर या बंडखोर आमदार विरोधात आंदोलन, घरावर कार्यालयावर हल्ले सुरु आहेत व कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. सत्तानंतर तूर्तास तरी शक्य दिसत नाही. शिवसेना नेत्याकडून बंडखोर आमदारांना मुबंईत पाय ठेवा यासह अन्य मार्गातून धमकी वजा चिथावणी दिली जात आहे या पार्शवभूमीवर शिंदे यांनी भावनिक पोस्ट केली आहे. आम्ही हे सर्व बंड शिवसेना पक्ष राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या तावडीतून वाचविण्यासाठी करीत असल्याचा खुलासा शिंदे यांनी केला आहे.