जामीन मंजुर – तथाकथीत राष्ट्रसंत लोमटे महाराज यांना बलात्कार प्रकरणात दिलासा
धाराशिव – समय सारथी
कळंब तालुक्यातील श्री दत्तमंदिर तीर्थक्षेत्र मलकापूरचे तथाकथीत राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना बलात्कार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असुन कोर्टाने त्यांचा नियमित जामीन मंजुर केला आहे.
कळंब येथील सत्र न्यायाधीश कळंब यांनी येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम 376, 354, 354 अ, 354 सी, 341, 323, 504, 506, 509, आयटी कायदा कलम 66 ई, 67, 67 अ तसेच जादूटोणा कायदा कलम 2(1) प्रमाणे दाखल असलेल्या विनयभंग व बलात्कार प्रकरणात ॲड रवींद्र मैंदाड यांचा युक्तिवाद ऐकून घेऊन जामीन मंजूर केली. सदर प्रकरणात युक्तिवाद कामी ॲड श्रीकांत माळी, ॲड आकांक्षा माने, ॲड राम राऊत यांनी सहकार्य केले.











