आज धाराशिव जिल्हा बंदची हाक – जालना घटनेचा निषेध
धाराशिव – समय सारथी
आज 2 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.जालना येथील घटनेच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन केले असुन तुळजापुर, कळंब येथील समाजाने बंदचे आवाहन केले असुन निषेधाचे निवेदन देण्यात येणार आहे तसेच वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळ पासुन एकही बस बसस्थान व डेपोबाहेर आली नाही.