धाराशिव – समय सारथी
लोन अर्थात कर्ज मिळवण्याचा मोह धाराशिव येथील एका तरुणाला चांगलाच महागात पाडला आहे, ऑनलाईन अर्ज भरल्याने कर्ज मिळेल अशी त्याला आशा होती मात्र कर्ज मिळणे दुर त्याला स्वतःच्या खिशातील 2 लाख 23 हजार रुपयांना मुकावे लागले आहे. आरोपी मो.क्र 9558110974 चा धारक, शितल शिंदे, मो.क्र. 9624433270 चा धारक श्वेता शिंदे, मोक्र. 9152919316 चा धारक चेतना पवार, मो. क्र. 8401581016 चा धारक अविनाश देशमुख व इतर प्रदीप कुमार, शुभम खातुन व सागर भगवान मोकाले यांनी 9 नोव्हेंबर 2023 ते 16 जुलै 2024 या काळात फसवणूक केली.
धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील डोकेवाडी येथील फिर्यादी पोपट अंकुश खैरे यांच्या मोबाईलवर फेसबुकवर ऑनलाईन आयडीएफसी फस्ट बॅकेची लोन बाबतची जाहीरात पाहिली व त्यावरील लोन बाबतचा फॉर्म भरला असता आरोपींनी फिर्यादीस ऑनलाईन लोन मंजुर करतो असे म्हणून वेळोवेळी फाईल चार्जचे कारण सांगुन फिर्यादी यांचे कडून 2 लाख 23 हजार ऑनलाईन पैसे घेवून फसवणुक केली. खैरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 318(1) सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम 2008 चे कलम 66(सी), 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.