धाराशिव – समय सारथी
गणवेश व शालेय साहित्याच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची आर्थिक लुट केल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कुलला 25 हजार रुपयांचा दंड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष यांनी ठोठावला आहे. या शाळेत पालकांची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार नवनाथ कसबे यांनी केली होती त्यावर चौकशी अंती ही कारवाई करण्यात आली आहे. यासारख्या अनेक इतर शाळाच्या तक्रारी असुन त्याच्यावर पण अशीच कारवाई होऊ शकते.
शाळेने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियम 2009 मधील तरतुदीचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. दुर्बल व वंचित घटकातील बालकांना 25 टक्के प्रवेश देण्याच्या सक्तीच्या सुचना होत्या मात्र ताकीद देऊनही सदर शाळेच्या वारंवार तक्रारी येत होत्या त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण उपजिल्हाधिकारी शिवाजी फाटक, पंचायत समिती विस्तार अधिकारी सूर्यभान हाके व अशोक खुळे यांनी चौकशी केली होती त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी घोष यांनी ही कारवाई केली. कसबे यांच्याकडुन घेण्यात आलेले 4 हजार 500 रुपये परत करण्याचे आदेश देऊनही त्यांना ते शाळेने परत केले नाहीत.