शिवसेना नाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठवले – दोन्ही गटांना पर्याय सादर करावे लागणार
मुंबई – समय सारथी
शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने गोठाविले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अंतरिम आदेश पारित केला आहे, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोघांनाही शिवसेनेसाठी राखीव असलेले धनुष्यबाण हे चिन्ह व नाव वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, दोन्ही गटांना सध्याच्या पोटनिवडणुकांच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवडून येण्यासारखी भिन्न चिन्हे दिली जातील. त्यानुसार, दोन्ही गटांना 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत याबाबतचा निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत.