अखेर त्या लेडी कंडक्टर व वाहकाचे निलंबन मागे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील अखेर त्या लेडी कंडक्टर व वाहक याचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केली म्हणून कारवाई केली होती. टिक टॉक स्टार कळंब एसटी आगारातील लेडी कंडक्टर मंगल सागर गिरी व वाहक कल्याण कुंभार याचे निलंबन एसटी महामंडळाने वापस घेतले आहे. त्यांना 13 ऑक्टोबर पासून कामावर रुजू करण्याचे आदेश आगार व्यवस्थापक यांनी दिले आहेत.
निलंबन केल्यानंतर एसटी महामंडळवर सोशल मीडियावर टीका झाल्यावर निलंबन कारवाई वापस घेतली आहे.निलंबित लेडी कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. स्वतःचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केलेप्रकरणी ही निलंबन कारवाई करण्यात आली होती.