धाराशिव – समय सारथी
राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांचे नातु, भाजप आमदार राणाजगजीतसिंह व अर्चना पाटील यांचे पुत्र मेघ यांचा वाढदिवस असल्याने पाटील परिवाराने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तुला पाहिले की कायम वाटते.. डॉक्टर साहेबांची “सेम टू सेम कॉपी” तुझ्यात असलेली संवेदनशीलता आणि विलक्षण प्रसन्नता तसेच सर्वांना आपलेसे करणारे पाटील घराण्याचे, विशेषतः डॉक्टर साहेबांचे, उपजत गुण यामुळे कमी वयात तू सर्वात लोकप्रिय झाला आहेस.. अंगभूत हुशारी आणि हळवे मन या “रेअर कॉम्बिनेशन” मुळे जे काम हाती घेतोस ते प्रामाणिकपणाने पूर्ण करतोस, यशस्वीपणे पूर्ण करतोस. तुजा अभिमान आहे असे म्हणत मल्हार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
संवेदनशील तू आहेसच, आजोबांसारखा खंबीर आणि वडिलांसारखा कर्तृत्ववान हो ! हाच वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देते असे म्हणत अर्चना पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
चि.’मेघ’ नावाप्रमाणेच तू कर्तृत्वातून अथांग उंची गाठावी याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिल्या आहेत.
आज तेरणा युथ फाउंडेशनचे लोकार्पण
मेघ हे गेल्या काही महिन्यात सक्रीय राजकारण व समाजकारणात उतरले असुन त्यांच्या नेतृत्वात तेरणा युथ फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन 9 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता राजे शहाजी महाद्वार येथे याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. युवकांनी युवकांसाठी उभी केलेली अभिनव सामाजिक चळवळ असे ब्रीदवाक्य असुन यानिमित्ताने मेघ पाटील हे या संस्थेचा कारभार पाहणार आहेत.