धाराशिव – समय सारथी
नववी आणि दहावीच्या वर्गाला 2018 साली मान्यता मिळूनही शिक्षक मिळत नसल्याने सांजा येथील गावकरी आक्रमक झाले असुन त्यांनी शाळेला कुलूप ठोकत जिल्हा परिषदेत वर्ग भरवण्याचा इशारा दिला आहे.
धाराशिव तालुक्यातील सांजा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 9 वी व 10 वी या वर्गाला 2018 रोजी मान्यता दिली होती मात्र शिक्षकाची नेमणूक केली नव्हती तेव्हापासुन शाळेला शिक्षक दिला नव्हता. शाळेला शिक्षक मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी लोकवाटा करून शिक्षकाची नेमणूक करून शाळा चालवली.जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी आक्रमक हऊन थेट शाळेला टाळे ठोकून शाळा बंद केली आहे.
जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळणार नाहीत तोपर्यंत ही शाळा सुरू होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. शाळेला टाळे ठोकूनही शिक्षक न मिळाल्यास धाराशिव जिल्हा परिषदेतच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवणार असल्याचा इशाराही ग्रामस्थ आणि पालकांनी दिला आहे.