धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघात मतमोजणी अंती शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना 52 हजार 176 मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपमधुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन उमेदवारी मिळालेल्या अर्चना पाटील यांना 86 हजार 615 मते तर ओमराजे यांना सर्वाधिक 1 लाख 38 हजार 791इतकी मते मिळाली आहेत. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 6 हजार 107 इतकी मते मिळाली आहेत.
तुळजापूर मतदार संघात भाजपचे आमदार तथा अर्चना पाटील यांचे पती राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती,मात्र त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठे अपयश आले आहे मागील 2019 ला राणा पाटील हे लोकसभेला राष्ट्रवादीकडुन उभे होते त्यानंतर ते भाजपात गेले व 2024 ला पत्नीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राणा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना 23 हजार 169 मतांनी पराभूत करुन विजयी झाले. 29 हजार 7 इतक्या मताने फरक वाढला आहे.
आताच्या लोकसभेत सुनील चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे तर मधुकरराव चव्हाण काँग्रेसमध्ये आहेत.तरी देखील पदरी अपयश आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला 22 हजार 282 मतांची आघाडी दिली होती. शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 1 लाख 10 हजार 315 मते तर राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांना 88 हजार 33 मते मिळाली होती मात्र 2024 मध्ये ओमराजे यांना 52 हजार 176 मतांची लीड आघाडी मिळाली आहे, मागील लोकसभा तुलनेत 29 हजार 894 मताची भर पडली आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात 65.40 टक्के मतदान झाले असुन 3 लाख 75 हजार 562 पैकी 2 लाख 45 हजार 637 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तुळजापूर मतदार संघात मतमोजणीच्या 29 फेऱ्या/राऊंड झाले. सर्वच्या सर्व राऊंडमध्ये ओमराजे यांना लीड मिळाली हे विशेष.