धाराशिव – समय सारथी
निष्क्रिय खासदार सहानुभूती मिळविण्यासाठी निष्फळ कार्यशाळेतून हाती काहीही लागणार नाही असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना लगावला आहे.
मोदी लाटेत खासदारकी मिळवलेल्या ओमराजेंनी निष्क्रियतेचा किताब मिळवलेला आहे. नोटंकी आणि नाटकी संभाषणातून दिशाभूल कार्यक्रम आजवर राबवलेला आहे. मतदार नसलेली युवा पिढी खासदाराच्या नोटंकीला दाद देतात. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच निष्क्रिय खासदार निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढणार असल्याची चर्चा आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर खासदार निंबाळकरांनी नरेंद्र भाई मोदी च्या नावाचा जयघोष केला होता.
सभागृहात देखील त्यांच्यावर स्तुती सुनने उडाली होती हाही इतिहास आठवावा लागणार आहे, हे निष्क्रिय खासदार आता कार्यशाळेसारखे गोंडस शब्द वापरून, जनतेला पुन्हा चुना लावण्यासाठी खासदाराची तालीम सुरू आहे. त्यांच्या टोळीतील अमर अकबर आणि अँथनी यांच्या दुकानदारीला मागच्या अडीच वर्षात टाळे लागलेले आहे.
खासदार महोदयांनी संविधानिक पदावर विराजमान व्यक्ती संदर्भात जबाबदारीने बोलावे, जनाधार नसलेल्या तथाकथित लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर बोलावून बंद खोलीत कार्यशाळा घ्यायची वेळ खासदारावर आली आहे ही शोकांतिका आहे असे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील म्हणाले.