धाराशिव – समय सारथी
प्रधानमंत्री कौशल विकासासाठी योजनेच्या जाहिरातीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संतप्त होत शासकीय अधिकारी यांना फैलावर घेतले. केंद्र सरकारच्या जाहिरातीत भारत सरकार ऐवजी मोदी सरकार चालतं मग धाराशिवचा खासदार मी आहे तर धाराशिवमध्ये राजे निंबाळकर सरकार म्हणलं तर चालेल का ? असा सवाल त्यांनी संतप्त होत विचारला.
दिशा समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील रखडलेल्या कामावरून अधिकाऱ्याने फैलावर घेतले. धाराशिव येथे प्रधानमंत्री कौशल योजनेच्या जाहिरातीवरून ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर संतप्त झाले असून दिशा समितीच्या बैठकीत या जाहिरातीवरून अधिकाऱ्यांनाच खडे बोल सुनावले आहेत.
योजना राबवायची म्हटलं तर सर्वसामान्यांचा पैसा व सर्वसामान्य हितीसाठी राबवली जाते मात्र कोणता तरी पक्ष ते वैयक्तिक स्वार्थासाठी व नेते वैयक्तिक फायद्यासाठी त्याचा वापर करतात. केंद्रातलं सरकार म्हणजे मोदी सरकार, मी धाराशिवचा खासदार मी निवडून आलो आहे मग राजे निंबाळकर सरकार म्हणलं तर चालेल का ? असा सवाल अधिकाऱ्यांना उपस्थित केला. अशा जाहिराती करू नका असा सूचना देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिला एवढेच नाही तर जिल्ह्यातील केंद्रातील योजना या रखडलेल्या असल्याने ओमराजे निंबाळकर यांनी त्याचा आढावा घेतला.
बैठकीनंतर त्यांनी पत्रकार यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, भाजप धाराशिव येथे उमेदवार द्यायला घाबरत आहे,भीती नसती तर आतापर्यंत उमेदवार कामाला लागला असता. तुमचा पैलवान तरी मैदानात उतरवा असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर भाजप व त्यांच्या घटक पक्षांना खुले आव्हान दिले.
भाजपला त्यांचा उमेदवार जाहीर करायला इतका वेळ का लागतो, याचा विचार भाजपने व त्यांच्या घटक पक्षाने करावा. मी कायम सांगत असतो तुमचा पैलवान कोण आहे ते तरी जाहीर करुन मैदानात उतरवा, जनता ठरवेल ना ? जनतेला निर्णय घेऊ द्या ? माझं काम योग्य वाटत असेल तर मला निवडून देतील नाहीतर पाडतील असे ओमराजे म्हणाले. यावेळी आमदार कैलास पाटील उपस्थितीत होते.