प्राचार्य म्हणून डॉ नितीन कुंभार यांनी पदभार स्वीकारला
धाराशिव – समय सारथी
डॉ.नितीन कुंभार यांनी डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिवच्या प्रभारी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला.
धाराशिव येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विधी कॉलेज असुन डॉ कुंभार हे येथे अध्यापन करत आहेत त्यांची प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉ कुंभार यांचे कायद्याचे शिक्षण हे याच विद्यालयात झाले आहे. ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्याच कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून नेमणुकीचा हा योग आहे. डॉ कुंभार यांनी शनिवारी पदभार घेतला. संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंके, सचिव सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.