धाराशिव – समय सारथी
धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात व शासकीय रुग्णालयात औषधाचा तुटवडा निर्माण झाला असुन शिवसेनेच्या ठाकरे गटाने गांधींगिरी आंदोलन करीत मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिष्ठाता यांना नारळ व औषधाची खोके भेट देत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
औषधाबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे ही रिक्त आहेत. वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीप आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आढावा घेत पद व औषध तुटवडा दूर करू असं सांगितलं होतं मात्र प्रश्न मिटला नाही.
नुकतीच नांदेडची घटना घडली व धाराशिव जिल्ह्यातील अशाच प्रकारचा औषधाचा तुटवडा आहे याच मुद्द्याला घेऊन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिष्ठाता डोमकुंडवार यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गांधीगिरी आंदोलन करत कर्मचाऱ्यांना नारळ व रिकामे खोके भेट देत घोषणाबाजी केली.
आठ दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे