पवनचक्की माफिया – पालकमंत्री डॉ सावंत यांचे कार्यकर्ते पुन्हा चर्चेत
जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांच्यासह 16 जणांवर गुन्हा नोंद
पोलीस व महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष – माफियाला पोसतय कोण ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफिया वाढला असुन दिवसेंदिवस त्यांनी केलेल्या दबंगगिरीच्या सुरस कहाणी समोर येत आहेत. आनंद पाटील यांनी पवनचक्की उद्योजकांना मारहाण, दमदाटी केली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य आनंद पाटील यांच्यासह 16 जणांवर पवनचक्की चालकांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाटील हे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर, भुम, परंडा या पठारी भागात पवनचक्की माफिया वाढताना दिसत असुन त्यांना पोसतय कोण हा प्रश्न चर्चीला जात आहे. पोलिस व महसूल विभाग सुद्धा याबाबत हतबल झाले आहे. काही पवनचक्की उद्योजक शेतकरी यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत तर काही स्थानिक पुढारी गावागुंडाच्या मार्फत पवनचक्की उद्योजकांना दबंगगिरी करीत आहेत.
आनंद पाटील यांच्यासह 16 जना विरोधात मुरूम पोलिस ठाण्यात कलम 452,365, 323,427,143,147,149,504,506,507 अन्वये गुन्हा नोंद झाला असून पोलिस तपास करीत आहेत.