उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 29 झाली असून त्यापैकी 5 जण बरे झाले असून 24 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सापडलेले रुग्ण हे शिराढोण व मुरूम येथील असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सुरू केले आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1071 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्यातील 964 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.