धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील जनता सहकारी बँकेच्या 7 संचालकावर रिझर्व्ह बँकेने अपात्रतेच्या कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सप्टेंबर व नोव्हेंबर 22 आणि 7 नोव्हेंबर 2022 मधील नवीन नियमांनुसार कोणत्याही सहकारी बँकेच्या संचालकास सलग दहा वर्षे या पदावर कार्यरत राहता येत नाही. याच आधारे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
विद्यमान व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजिनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांना तात्काळ पदावरून काढण्याचे निर्देश दिले आहे. आता केवळ 4 संचालकावर कारभार चालणार आहे. अपात्र ठरवलेल्या 7 जागेवर संचालक नेमले जाणार की रिक्त राहणार याकडे लक्ष लागले आहे. जनता बँकेत आगामी काळात अनेक प्रशासकीय व राजकीय घडामोडी घडणार आहेत.
जनता सहकारी बँक धाराशिवच्या 13 संचालकांपैकी 9 संचालक सलग 10 वर्ष संचालक पद या नियमामुळे अपात्र ठरत होते. याप्रकरणी पिराजी मंजुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. याचिकाकर्ते व बँक यांची बाजु ऐकून घेऊन लेखी व तोंडी युक्तिवाद करण्यात आला.
बँकेचे विद्यमान व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजीनाथ शिंदे, संचालक विश्वास शिंदे, सुभाष धनुरे, तानाजी चव्हाण, श्रीमती करुणा संजय पाटील, हरी रामजीवन सूर्यवंशी, नंदकुमार नागदे या 7 जणांचा समावेश आहे तर निवृत्तीराव भोसले व सुभाष गोविंदपूरकर हे 2 संचालक मयत झाले आहेत.13 जणांच्या संचालक मंडळ कार्यकारिणीमध्ये 2 मयत असल्याने 11 जण कार्यरत होते.
महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यात जनता बँकेचे कार्यक्षेत्र आहे. जनता बँकसारखे इतर अन्य बँकेत काही संचालक वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे.











