उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून आज कोरोनाचे सर्वाधिक 239 रुग्ण सापडले असून रुग्णांचा आकडा कायम राहिला, एकट्या उस्मानाबाद तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्यने शंभरी पार केली असून 135 रुग्ण सापडले आहेत त्यातील 86 रुग्ण उस्मानाबाद शहरातले असल्याने उस्मानाबाद शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालले आहे. आज सोमवारी 239 नवीन रुग्ण सापडले असून त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 135 व उमरगा तालुक्यातील 20 आणि तुळजापूर तालुक्यातील 25 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 1 हजार 627 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आज दिवसभरात 146 रुग्ण बरे झाले तर 239 नवीन रुग्ण सापडले त्यात 150 हे रॅपिड चाचणी तर 89 हे आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 54 हजार 774 नमुने तपासले त्यापैकी 20 हजार 040 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याच दर 15.54 टक्के आहे. जिल्ह्यात 17 हजार 821 रुग्ण बरे झाले असून 88.93 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 592 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.95 टक्के मृत्यू दर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 135 रुग्ण , तुळजापूर 25, उमरगा 20, लोहारा 14, कळंब 14, वाशी 13, भूम 10 व परंडा तालुक्यात 8 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा
1 मार्च – 9
2 मार्च – 40
3 मार्च – 16
4 मार्च – 45
5 मार्च – 26
6 मार्च – 30
7 मार्च – 49
8 मार्च – 16
9 मार्च – 38
10 मार्च – 24
11 मार्च – 58
12 मार्च – 27
13 मार्च – 54
14 मार्च – 69
15 मार्च – 52
16 मार्च – 123
17 मार्च – 94
18 मार्च – 164
19 मार्च – 119
20 मार्च – 125
21 मार्च – 118
22 मार्च – 173
23 मार्च – 130
24 मार्च – 176
25 मार्च – 174
26 मार्च – 155
27 मार्च – 224
28 मार्च – 184
29 मार्च – 239