धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात निंबाळकर राठोड यांच्यात झालेल्या मारहाणीत माजी नगरसेवक रोहित निंबाळकर , मंगेश भुजबळ, पृथ्वीराज पाटील या 3 जणांवर विजय राठोड यांनी गुन्हा दाखल करण्यात आले. आनंद नगर पोलीस ठाण्यात विजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी तक्रार दिली. पत्नीची छेडछाड का काढली याचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर 3 आरोपीनी मारहाण केल्याचे तक्रारी म्हणटले आहे.
विजय राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत नुसार, 30 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजणेच्या सुमारास मला आमचे गावीतील पृथ्वीराज रामदास पाटील रा भानुनगर धाराशिव याला त्याचे दुकान शिवशक्ती एंट्रप्रायजेस येथे जाऊन माझे पत्नी हिची छेड का काढली असे विचारले तसेच तेथे तो इतर लोकांना घेऊन बसला होता म्हणून माझा राग अनावर झाला त्यामुळे आमचेत वाद झाला तेथे असलेले रोहित शशीकांत निंबाळकर व मंगेश भुजबळ यांना माझे सोबत वाद करून रोहित निंबाळकर याने शिवीगाळ करुन अॅल्युमिनियम चे पट्टीने मला मारत असताना माझे उजवे हाताचे अंगठ्याजवळील बोटाला जखम होऊन रक्त निघाले व माझे डावे मनगटावर व कोपरावर पट्टीने नारुन दुखापत केली.
मंगेश भुजबळ याने पण अॅल्युमिनियमचे पट्टीने माझे डोकयात डावे बाजुस मारुन दुखापत केली त्यावेळी तेथे असलेले सुरेश पवार याने आमचे भांडण सोडवत होता. त्यांचे तावडीतुन सुटत मी बाहेर ऑलो. बाहेरपण मला ते मारत होते. गल्लीतील लोक जमा झाले ते बघुन घेतो व जिवे मारतो अशी धमकी देऊन ते तेथून निघुन गेले.
जाता जाता मला व आकाश तावडे यांना दहा ते पंधरा दिवसात जिवे मारतो अशी धमकी दिली माझे डोक्यातुन रक्तस्राव व हातातून रक्तस्राव होत असलेने माझे मित्र शांताराम लोंडे, संदेश जाधव व बबलु गाढवे तसेच माझा भाऊ अरुण राठोड यांनी मला लाईफ लाईन हॉस्पीटल धाराशिव येथे उपचारकामी घेऊन आले.












