मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे ‘ मॅटीनी मुख्यमंत्री ‘- वर्षभर मंत्रालयात पायही ठेवला नाही
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा लेटर बॉम्बने हल्लाबोल
मुंबई – समय सारथी
१८ महिन्याच्या काळात मुख्यमंत्र्यांचा जनसंपर्क किती ? याऊलट देवेंद्र फडणवीस यांच्या काळात संपवलेले व्हीआयपी कल्चर पुन्हा सुरू केल्याबद्दल तुमच आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुकच आहे असा टोला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना खरमरित पत्र लिहीत शिवसेना माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांच्या पत्राचा पत्राद्वारेच समाचार घेतला आहे. कुवत नसणारी लोक मोदीजींना बोलायला लागलीत. शिवसेनेचे सर्व खासदार हे फक्त मोदींमुळेच तर ५ वर्ष सत्ता भोगली ती ही मोदींमुळेच असा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे ‘ मॅटीनी मुख्यमंत्री ‘ असच गंमतीनं म्हणतात म्हणूनच एक वर्षभर तर मंत्रालयात पायही ठेवला नाही. माझ कुटूंब माझी जबाबदारी हिच त्यांची सर्वार्थानं प्राथमिकता असल्याचा निशाणा पत्रातून मुख्यमंत्र्यांवर केला आहे. आदित्यजी आपले बाबा मुख्यमंत्री तसच ‘पुण्यवान’ माणसांची तुम्हाला साथ, तुम्हाला कधीच आर्थिक चणचण भासणार नाही पण आता तुम्ही मुंबईबाहेरील महाराष्ट्र समजून घेत युवकांची परिस्थिती सावरण्यासाठी बघा असा सल्ला दिला आहे. मंत्री संजय राठोड, अनिल देशमुख आणि आता तुमचे अनिल परब अडचणीत आहेत याचे तुम्हीही साक्षीदार तर मग महाविकास आधाडीत एवढे ‘ प्रताप ‘ सुरू असताना केंद्राकडे बोट दाखवून स्वतच भ्रष्ट राजकारण झाकण्याची धडपड कशासाठी करता असा सवाल केला आहे. भाजप युवा मोर्चा विरूद्ध युवासेनाप्रमुखांना खुल पत्र दिले आहे. विक्रांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलेल्या
पत्राच उत्तर द्यावे असे आवाहन युवा मोर्चाने युवासेना प्रमुखांना केले आहे.