आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नातून 6 आरोग्य उपकेंद्र मंजुर
परंडा – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नातून भुम व परंडा तालुक्यात 6 ठिकाणी विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्यात आले आहेत. डॉ सावंत हे आरोग्य मंत्री असल्याने भुम परंडा वाशी या भागात मोठी आरोग्य क्रांती झाली असुन न भुतो न भविष्याती अश्या आरोग्य सुविधा या भागात निर्माण होत आहेत. परंडा तालुक्यातील 4 तर भुम तालुक्यातील 2 ठिकाणी आरोग्य केंद्र मंजुर केले आहे.
परंडा तालुक्यातील पाचपिंपळा, चिंचपुर खु, ढगपिंपरी, घारगाव येथे विशेष बाब म्हणून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्यात आले आहे त्याच बरोबर भुम तालुक्यातील नागेवाडी व घाटनांदूर येथे विशेष बाब म्हणुन नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर केले आहे.मंत्री सावंत यांच्यामुळे अनेक ठिकाणी उपकेंद्र मंजुर झाले असुन उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाले आहे.