उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एका गावातील शेतात डीपी बसवण्यासाठी 55 हजारांची लाच घेताना 2 जणांना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली आहे. महावितरण विभागाचे एका इंजिनिअरसह 2 जण अटकेत असून याबाबत अधिक तपास सुरू आहे , या अधिकाऱ्यांना उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी परिसरात लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावातील शेतात डीपी बसवण्यासाठी 1 लाखांची मागणी करण्यात आली होती त्यातील 55 हजार घेताना अटक केली आहे. उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही मोठी कारवाई आहे.
शेतकऱ्यांना डीपी बसवून घेण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितली जाते याला या प्रकारामुळे पुष्टी मिळाली आहे
लाचखोर यंत्रणा