धाराशिव – समय सारथी
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा व धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करीत 50 गाईसह 2 आरोपी ताब्यात घेतले आहेत, या गाई कत्तलसाठी धाराशिव येथे अकलूज येथून आणल्या असुन पोलिसांनी गाई, 2 वाहन व 2 आरोपीना ताब्यात घेतले आहे. धाराशिव शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे.
पोलिसांनी MH 12 AR 9425 व MH 45 0927 असे 2 वाहन ताब्यात घेतले असुन त्यात गाईचे पाय, तोंड दोरीने बांधून कोंबण्यात आल्या होत्या. ज्या 2 चालकांना ताब्यात घेतले आहे त्यांना धाराशिव शहरात गाई कुठे सोडायच्या आहेत हे सांगितले होते. त्या व्यक्तीच्या नाव व पत्ता सोडले तर या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे ते सांगत आहेत. गोवंश तस्करी करणारी मोठी टोळी धाराशिव शहरात व जिल्ह्यात सक्रीय असुन याचा शोध घेणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक शकील शेख व त्यांच्या पथकाने यांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलीस हवालदार राहुल नाईकवाडी, बळी शिंदे, दयानंद गादेकर, चालक घुगे सहभागी होते. पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरु आहे.