धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी 5 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत, त्यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. सेवन गटातील विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव या 2 फरार आरोपीसह तस्कर गटातील फरार आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यासह जेलमधील राहुल कदम परमेश्वर व सुलतान उर्फ टिपू शेख या 3 जणांना जामीन नाकारला आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी यात सरकारी पक्षाच्या वतीने कोर्टात सक्षमपणे बाजु मांडली तर तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी पोलिसांचे म्हणणे सादर केले.
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात आजवर कोर्टाने 14 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले असुन त्यात 6 आरोपी फरार आहेत तर 8 आरोपी हे धाराशिव येथील जेलमध्ये आहेत. 14 पैकी 12 आरोपी हे तस्कर गटातील तर 2 आरोपी हे सेवन गटातील होते. सेवन गटाला कोर्टात अटक व अटकपुर्व जामीन या दोन्ही बाबतीत दिलासा मिळाला नाही.
सेवन गटातील फरार आरोपी जगदीश पाटील (5 जुन) व अलोक काकासाहेब शिंदे (4 जुन) जेलमधील आरोपी आबासाहेब पवार (4 जुन) तर तस्कर गटातील फरार आरोपी उदय शेटे (4 जुन) असे 4 जणांचे जामीन अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत तर या प्रकरणातील जेलमधील आरोपीची नियमित सुनावणी 3 जुन रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात होणार आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
जामीन नाकारला (14) – फरार आरोपी इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर, स्वराज उर्फ पिनू तेलंग, मुंबई येथील ड्रग्ज तस्कर वैभव गोळे, विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव व माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर या 6 जणांचे अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळले तर धाराशिव जेलमध्ये असलेले मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संतोष खोत, संगीता गोळे, युवराज दळवी, अमित आरगडे, संकेत शिंदे, संदीप राठोड, राहुल कदम परमेश्वर व सुलतान उर्फ टिपू शेख या 8 जणांना जामीन नाकरला
फरार आरोपी (18) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 18 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कारागृहातील आरोपी (17) – यातील अमित उर्फ चिमू अशोक आरगडे,युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड, संगीता वैभव गोळे, संतोष अशोक खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी शाहुराज चव्हाण, सुमित सुरेश शिंदे, ऋतूराज सोमनाथ गाडे, संकेत अनिल शिंदे,पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन नागनाथ साळुंके, राहुल सुनील कदम – परमेश्वर व गजानन प्रदीप हंगरगेकर, रणजीत रंगनाथ पाटील, माजी सभापती शरद जमदाडे, आबासाहेब पवार हे 17 जण धाराशिव जेलमध्ये आहेत.