धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी मोठी कारवाई केली असुन शुभम नेप्ते या आरोपीस अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीचा तपास सुरु असुन आरोपीची संख्या आता 36 वरून 37 वर झाली आहे. पोलिसांना शुभम नेप्ते याच्या विरोधात पुरावे सापडल्याने त्याला अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात त्याचा सहभाग सापडून आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
नुतन पोलीस अधीक्षक रितु खोकर यांनी पदभार स्वीकारताच ड्रग्ज तस्करी गुन्ह्याच्या तपासाला पुन्हा गती आली असुन आरोपींची संख्या वाढली आहे, तपास अजुन संपलेला नाही, अनेक जन रडारवर आहेत असेच या निमित्ताने म्हणावे लागेल. तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलीसांनी कोर्टात चार्जशीट दाखल करताना 15 एप्रिल रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर याला आरोपी केले होते, त्यानंतर दीड महिन्यानंतर 37 वा आरोपी निष्पन्न होत अटक केला आहे, हे मोठे यश आहे.