32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबे यांचे कोरोनाने निधन – जावडेकर यांचे होते ते अतिरिक्त खाजगी सचिव
औरंगाबाद – समय सारथी
कोरोनाने महाराष्ट्रात कहर सुरूच ठेवला असून दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना कोरोनाने आपला जीव गमावला लागला आहे. औरंगाबाद येथे कोरोना उपचार दरम्यान 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबे यांचे निधन झाले असून ते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे अतिरिक्त खाजगी सचिव होते. तांबे यांच्या निधनानंतर मंत्री जावडेकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
तांबे यांच्या अचानक आणि अकाली निधनामुळे फार दु:खी आहे. कोविडमुळे वयाच्या 32 व्या वर्षी अनंत तांबे यांचे निधन झाले. ते अतिरिक्त पीएस म्हणून काम करत होते. एक तरुण आणि तेजस्वी आयआरएस अधिकारी गमावल्याचे दु:ख आहे. माझ्या प्रार्थना त्याच्या कुटुंबासमवेत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाची दुसरी लाट गंभीर ठरत असून यात अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे.