उमरगा, समय सारथी – शिवराज पाटील
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे 3 अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला व घरातून 5 हजार चोरत दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन बनविला मात्र पोलिसांच्या दक्षतेने हा बनाव उघड झाला असुन त्या मुलींचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. या तीन पैकी 2 मुली ह्या 11 वर्षाच्या आहेत तर एक मुलगी 13 वर्षाची आहे. आमच्या नरड्याला चाकू लावुन आमचे अपहरण करण्यात आले आहे असे सांगून घ्या मुली पुणेकडे निघाल्या व त्यानंतर त्यांनी दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन केला होता. ह्या मुली BTS-V ह्या कोरियन सिंगर व डान्स ग्रुपच्या फॅन होत्या, कोणत्याही स्तिथीत ह्या ग्रुपला भेटायचे असे म्हणत त्या तिघीनी अपहरणाचा प्लॅन रचला व घरातून पळ काढला. पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपास केला व मुलींची सुखरूप सुटका करीत पालकांच्या स्वाधीन केले. उमरगा पोलीसांनी ऑपरेशन मुस्कान अंर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत अवघ्या 30 मिनिटाच्या आत 3 अल्पयीन मुलीचा अपहरणाचा बनाव उघडा करीत त्यांचा शोध घेतला.
उमरगा तालुक्यातील निलुनगर तांड्यात राहणाऱ्या 3 अल्पवयीन शाळकरी मुलीना ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथुन शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या स्कुलबस मधुन काही लोकांनी किडनेप करून घेवुन गेले आहेत, त्यांचे गळ्यावर चाक ठेवून चाकुचा धाक दाखवुन त्यांना नेले आहे असा कॉल पोलिसांना आला, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. बीट मार्शल पोकॉ योगेश बिराजदार याना आलेल्या कॉलवरून कॉल करणारे व्यक्तीला लागलीच फोन करुन तुम्हाला अपहरणाची गोष्ट कशी समजली याबाबत फोनवर विचारपुस केली त्यावेळी त्यांनी एका फोन वरून माझी मुलगी लक्ष्मी हिनेच ही गोष्ट आम्हाला कळवली असे सांगितले. मोबाईल नंबरचे तातडीने लोकेशन काढले, ते मोहोळ येथे दाखवत असल्याने तिथे संपर्क करुन या मुली पुणे बसने जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना थांबवून पोलिसांकडे दिले. मुलींनी अपहरणाचा बनाव करुन स्वतः फोन केला. ह्या मुली दक्षिण कोरिया येथील ऐका सिंगर ग्रुपच्या फॅन होत्या त्यांना तिथे जाण्यासाठी त्यांनी हा कट रचून घरातून पळ काढला मात्र पोलिसांनी त्यांना शोधून काढले. उमरगा ते पुणे जायचे व पूणे येथे पैसे कमवून कोणत्याही स्तिथीत दक्षिण कोरियाला जात तिथे त्या सिंगर ग्रुपला त्यांना भेटायचे होते.
पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली उमरगा पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि पिराजी तायवाडे, सपोनि कन्हेरे, पोउपनि गंगाधर पुजरवाड, पोना अनुरूद्र कावळे,पोकॉ योगेश बिराजदार, पोकॉ बळीराम सोनटक्के यांनी केलेली आहे.