14 नगरसेवकांची राष्ट्रवादीतुन 6 वर्षासाठी हकालपट्टी – जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार
तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर नगर परिषदेचे अध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह 14 नगरसेवकांना राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केल्याने 6 वर्षाकरिता पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. नगराध्यक्षसह सर्व नगरसेवक हे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत गेले होते.
2019 विधानसभापासून वारंवार पक्ष विरोधात काम करत असल्यामुळे व पक्षाच्या 2019 पासून कोणत्याही बैठकीस हजर न राहिल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्ष जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे,ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. शहर व तालुका पदाधिकारी यांच्या बैठकीच्या चर्चेनुसार निर्णय घेऊन सहा वर्षासाठी खालील सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद पिंटू गंगणे, नगरसेविका अर्चना विनोद गंगणे, औदुंबर कदम नगरसेविका, पंडितराव जगदाळे,चंद्रकांत कणे, मंजुषा प्रसाद देशमाने, किशोर बाबुराव साठे,आशाताई विनोद पलंगे,विजय राजेंद्र कंदले,रेशमा अविनाश गंगणे नगरसेविका वैशाली तानाजी कदम, भारतीताई नारायण गवळी, अश्विनी विशाल रोचकरी या सदस्यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमधून सहा वर्षाकरिता निलंबित करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली आहे.