10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा – या शेतकऱ्यांना मिळणार मर्यादीत स्वरूपात मदत
उस्मानाबाद – समय सारथी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे. जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर,बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर,बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली असुन ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.