९२ नगरपरिषदांतील ओबीसी आरक्षणावर सुनावणी – सुप्रीम कोर्टात पुन्हा तारीख पे तारीख
उस्मानाबाद – समय सारथी
ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणूकीबाबत राज्य सरकारने झालेल्या सुनावणीत अधिक वेळ मागितला त्यानुसार कोर्टाने वेळ वाढवून दिला आहे. आता या प्रकरणी २८ नोव्हेंबर ला सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबतच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं प्रभाग रचनेबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्याबाबत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते त्यानुसार मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली.