१४ एप्रिलच्या निमीत्तान देवेंद्र फडणवीसांनी १४ ट्विट करत शरद पवार यांचा घेतला समाचार
उस्मानाबाद – समय सारथी
डॅा बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना डिवचल आहे.एका बाजुला आपण थाटामाटात डॅा आंबेडकर जयंती साजरी करतोय पण दुसरया बाजुला त्यांच्या विचारांना बाजुला करतोय असे फडणवीस यांनी पवारांना उद्देशून म्हण्टले आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता. जम्मु आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा विरोध होता पण पवारांच यावर मत काय हे सर्वांनाच माहीती आहे. पवारांचे याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्यात कसलही आश्चर्य नाही. त्यांच्या पक्षाचा संपुर्ण इतिहास पाहिला तर अश्याच पद्धतीन जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॅार्ड आहे अशी टीका फडणवीस यांनी पवारांवर केली.
बाबासाहेबांचे सर्व विचारांचा शरद पवारांना फडणवीसांनी आठवण करून आहे. अनुनयाच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना फडणवीस यांनी काही बाबींचे स्मरण करून दिले आहे.
आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही समाचार घेतला.
मंत्री नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचे स्मरण करून दिले. इशरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही स्मरण फडणवीस यांनी ट्विट करून दिले. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख फडणवीस यांनी केला. 2012 मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही याचाही उल्लेख केला.
संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला ? अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, याही विधानाचे समरण करून दिले. हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत निशाणा साधला.
सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख केला. मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून ? काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही ! असे म्हण्टले आहे.१४ ट्विटस करत फडणवीसांकडून शरद पवारांचा समाचार घेतला आहे.