नवरात्र उत्सवात विधीवत स्थापना , बांधकाम पूर्णत्वाकडे, पुतळ्यासाठी मोठा संघर्ष
तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचे दर्शन मिळणार
तुळजापूर – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बांधकामाचे काम पूर्ण झाले असून
लवकरच या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यात येणार असल्याची
माहिती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली. पुतळा काम अंतिम टप्प्यात असुन या
कामास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना
तुळजाभवानी देवीने भवानी तलवार दिल्याने तुळजाभवानी व शिवाजी महाराज यांचे
नाते वेगळे आहे. तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सव काळात हा पुतळा विधीवत पूजा
मुहूर्तावर स्थापित केला जाणार आहे त्यामुळे आता शिवभक्तांना तुळजाभवानी
सोबतच तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे दर्शन
होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती
पुतळाही तयार होत आला आहे. हे दोन्ही पुतळे औरंगाबाद येथे होत
आहेत.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक विनोद गंगणे,पंडीतराव जगदाळे,विजय
कंदले,विशाल रोचकरी,बाळासाहेब सानप यांनी पाहणी केली.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा कार्यक्रम भव्य दिव्य
करण्यात येणार असून यासाठी विविध मान्यवर, शिवभक्तांना आमंत्रीत करण्यात
येणार आहे.या पुतळ्यामुळे तुळजापूरच्या वैभवात भर पडणार आहे.

पुतळ्यासाठी मोठा संघर्ष , तुळजापूरच्या वैभवात पडणार भर
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेने
विशेष सभा घेऊन आराखड्यास २० लाख रुपयांच्या कामाला
प्रशासकीय मंजुरी दिली होती मात्र २०१९ ते २०२१ या २
वर्षात पुतळ्याचे सुशोभीकरण विविध दुरुस्ती व आराखडा बदलल्याने
खर्च २० लाखावरून ७८ लाखावर गेले. प्रशासकीय मंजुरीपेक्षा ३०
टक्के पेक्षा अधिक आर्थिक खर्च वाढल्याने आता हे प्रकरण नगर विकास
विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी २० जानेवारी २०२१ पासून प्रलंबित होते.
सरकारने अतिरिक्त खर्चास मान्यता न दिल्याने पुतळा व चौक
सुशोभीकरणाचे काम रखडले होते. नगर परिषदेकडे विविध चौकचे सुशोभीकरण करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी
शिल्लक होते शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा औरंगाबाद
येथे तयार होता मात्र प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव
पाठवूनही तो सरकारकडून मंजूर न केल्याने काम सुरु होऊ शकले नव्हते
अखेर ११ फ़ेब्रुवारी २०२१ ला तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन
रोचकरी यांनी नगरसेवक विनोद गंगणे , विशाल रोचकरी,विजय कंदले व इतर
नगरसेवकानी उपोषणाचा इशारा देताच मान्यता दिली व हा विषय मार्गी
लागला.