स्वतंत्र भारताच्या आरोग्य इतिहासात अभूतपूर्व अभियान – 20 दिवसात 1 करोड महिलांची मोफत तपासणी
माता सुरक्षित अभियानास उदंड प्रतिसाद- आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत
मुंबई – समय सारथी
कुटुंबाचा कणा हा त्या घरातील माता असते मात्र हीच माता संसाराचा गाडा चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करते, याच मातेला स्मरून राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अशा उपक्रमाची संकल्पना मांडली. आरोग्य मंत्री सावंत यांच्या संकल्पनेतून आलेल्या या उपक्रमास शारदीय नवरात्रोत्सवा पासून राज्यात अभियानाच्या माध्यमातून राबविण्याचे ठरले, अभियान कालावधी हा अत्यंत कमी होता मात्र अत्यंत सुक्ष्म नियोजनाद्वारे याची अंमलबजावणी करण्यात आली. स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील एक करोड महिलांची मोफत आरोग्य तपासणी अवघ्या वीस दिवसात झाली हे विशेष
राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम,अदिवासी,डोंगराळ भागासह मोठमोठ्या महानगरातील मॉडर्न वसाहतीत अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणीस करण्यात येत असून ग्रामीण भागात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.या अभियानाचा एक कोटीचा टप्पा ओलांडल्या नंतर आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी आढावा घेतला , या आढाव्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून नाही तर दुर्गम, अतिदुर्गम,आदिवासी पाडे, तांडा वस्तीसह खेड्यातील महिलांचा प्रतिसाद भरभरून मिळत आहे, कधीच दवाखान्याची पायरी न चढलेल्या माताभगिनी ह्या स्वतःच्या आरोग्याच्या तपासणीसाठी पुढं येत आहेत. या महिलांना त्यांच्या गावातून प्राथमिक आरोग्य केंद्रा पर्यंत वाहनातून ने-आण करण्याची सुविधा आशाताई,अंगणवाडी सेविका यांच्या साह्याने केल्याने यास अपेक्षित असा प्रतिसाद मिळाल्याचे आरोग्य मंत्री सावंत यांनी सांगून तपासणी हा पहिला टप्पा आहे, त्यामुळे शेवटच्या महिलेची तपासणी होई पर्यंत शिबिरे सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.
वीस दिवसात आलेल्या अनुभवावरून हे अभियान अधिक सक्षम पणांनी राबविण्यासाठी आता नियोजनबद्ध कार्यक्रमा बरोबरच कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सुचना यावेळी देतांना आरोग्य विभागा बरोबरच अदिवासी विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, ग्रामीण विकास विभाग,सामाजिक न्याय विभाग, वैदयकिय शिक्षण विभाग, या विभागांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त माताभगिनींची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविले असल्याचे सांगितले.
राज्यातील साडेतीन करोड महिलांची मोफत आरोग्य तपासणी करावयाची असून यात विविध आजाराशी संबंधित 14 पेक्षा जास्त चाचण्या करण्यात येणार आहेत. ह्या सर्व चाचण्या विनामूल्य करण्यात येत असून याचा तपासणी अहवाल मिळताच पुढील उपचारा करिता संबंधित महिला रूग्ण, त्यांचे नातेवाईक आणी आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून पुढिल औषधोपचार करण्यात येईल. हे औषधोपचार तसेच काही शस्त्रक्रिया करावयाची गरज भासल्यास शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्यात येईल. याशिवाय आधिकचा खर्च लागणार असेल तर सीएसआर फंडातून हा निधी उभा करून रुग्णांवर उपचार केला जाईल असेही सावंत यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या सर्व प्रक्रियेची माहिती देण्यासाठी शासकीय तसेच निमशासकीय स्वयंसेवक देखील उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हय़ाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक यांनी आपली यंत्रणा अधिक सक्षम करून शेवटच्या महिले पर्यंत हे अभियान पोहोचावे असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले .
अत्यंत सुक्ष्म नियोजन केल्याने ह्या अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून महिलांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. संसाराचा गाडा चालवताना माताभगिनींची होत असलेली फरपट आपण खुप जवळुन अनुभवली असून यातूनच या अभियानाची संकल्पना सुचल्याचे सावंत यांनी यावेळेस सांगितले. विभागाचा एक उपक्रम म्हणून हे अभियान हाती घेतले नाहीतर जे अनुभवले त्यातून उतराई होण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .
राज्यातील १८ वर्षावरील महिलांना, मातांना, गर्भवतींना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे हे आरोग्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य आहे असे मानणारा मी असून सर्व शासकीय दवाखान्यात सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान वैदयकिय अधिकारी आणि स्ञीरोगतज्ञामार्फत १८ वर्षावरील महिलांची, नवविवाहीत महिला, गर्भवती यांची तपासणी , औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या अभियानाची सुरवात करण्यात आली असून आशा/अंगणवाडी आरोग्य सेविका/सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येते.
तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे. शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे/महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्ञक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असेही सावंत यांनी सांगितले. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच भरारी पथका मार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेञात येणार्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम आखण्यात आले असून यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांना जास्तीत जास्त महिला व माता यांना याबाबत सुचित करण्याच्या त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
अभियानातील ठळक बाबी
आतापर्यंत एकूण 1,29,57,045 महिलांची तपासणी करण्यात आली.
३० वर्षावरील 108330 महिलांना मधुमेह तर 183206 महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे प्राथमिक निदानातून आढळून आले.
एकूण 1177885 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 12894 मातांना उच्च रक्तदाब आढळून आला तीव्र रक्तक्षय असलेल्या 21856 मातांना आयर्न सुक्रोज देण्यात आले 111574 मातांची सोनोग्राफी करण्यात आली.
तीस वर्षावरील 12894 महिलांना हृदयासंबंधित आजार असल्याचे आढळून आले तर 21545 लाभार्थ्यांना कर्करोगची संशयित लक्षणे आढळून आले.
3011890 लाभार्थ्यांना मानसिक आरोग्य, तंबाखू सेवन करु नये याबाबत समुपदेशन करण्यात आले.