सोशल मीडियावर बदनामी – आक्षेपहार्य पोस्ट प्रकरणी कारवाईची मागणी
प्रदीप मुंडे यांच्या समर्थनार्थ 13 संघटनांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन
उस्मानाबाद – समय सारथी
सोशल मीडियावर जातीवाचक उपनाम देऊन बदनामी व जातीय तेढ निर्माण करीत असले प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या १३ संघटनांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हण्टले आहे की, उस्मानाबाद शहरातील नगरसेवक प्रदीप मुंडे 13 जानेवारी 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात तारखेसाठी गेले होते सुनावणी संपल्यानंतर ते व विधिज्ञ अमीत कोकाटे हे त्यांच्या गाडीवरून न्यायालय बाहेर जात असताना रस्त्यातून बाजूला सरकण्यावरुन तुळजापूर येथील मावजीनाथ महाराज यांनी शाब्दिक चकमक व वाद घातला, शिवीगाळ करून बघून घेतो अशी धमकी दिली.
सदरील कोरकोळ वादाला महंत मावजीनाथ महाराज व त्यांच्या समर्थकांकडून वेगळे स्वरूप व राजकीय, जातीयवाचक रंग देण्याचा प्रकार केला जात आहे. फेसबुक, व्हाट्स अँप यासह अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रदीप मुंडे यांचे नाव मोहमद उर्फ प्रदीप मुंडे असा नाम उल्लेख करून त्यांच्या फोटोसह पोस्ट केला जात आहे तसेच ‘कत्तल खान्याला विरोध केल्यामुळे घातला महंत मावजीनाथ महाराज सोबत वाद’ अश्या स्वरूपाचे पोस्ट केल्या जात आहेत. वादाचे कारण वेगळे असताना त्याला कत्तलखाना व मुस्लिम नावाने संबोधून जातीय रंग व तेढ निर्माण करीत बदनामी केली जात आहे. सदरील पोस्ट या विष्णू मिसाळ, हृषीकेश साळुंके,राहुल भांजी, शेखर गंगणे व इतर अन्य व्यक्तीकडून पोस्ट केल्या जात आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे
तसेच प्रदीप मुंडे यांना या प्रकरणात त्यांचे मोबाईलवर धमकीचे फोन येत असून तुम्ही महाराज यांना असे का केलात ? तुला उस्मानाबादमध्ये राहायचे नाही का? असे धमकावत जीवे मारण्याची व हल्ला करण्याची धमकी दिली जात आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी मागणी केली आहे. महंमद या मुस्लिम नावाने संबोधल्याने उस्मानाबाद येथील जातीय वातावरण बदलत आहे त्यामुळे आगामी काळात जातीय वाद व कायदा सुव्यवस्था याची स्तिथी निर्माण झाल्यास महंत मावजीनाथ महाराज व इतर सर्व व्यक्तींना जबाबदार धरावे असे म्हण्टले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लिगल सेल,जय हनुमान विचार मंच धाराशिव ,अठरापगड जातीच्या मावळ्यांची छावा,शिवराज्याभिषेक सोहळा समिती उस्मानाबाद,मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती,महाराष्ट्र राज्य फार्मसी कृती समिती,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, संभाजी ब्रिगेड, ए.जे.सोशल फाऊंडेशन, जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांचेसह तेरा पेक्षा जास्त संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक नीवा जैन यांची प्रदीप मुंडे यांनी भेट घेऊन व निवेदन देऊन चर्चा करून कारवाईची मागणी केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांनी दोषीवर लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासीत केले.