वाशी – समय सारथी, शोएब काझी
भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणी धाराशिव पोलिसांना मोठे यश मिळाले असुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपीना अटक केली आहे. किती रुपयांची सुपारी देण्यात आली ? जीव घेण्या हल्ल्याचे कारण व सुपारी देणारा मास्टर माईंड कोण ? याचा शोध सुरु आहे, पैशाच्या मोबदल्यात या 2 आरोपीनी 9 सप्टेंबर रोजी हल्ला केला होता. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार कारवाई केली.
भुम येथील सलमान पठाण व हाडोंगरी येथील रितेश अंधारे यांना येरमाळा उड्डाणपुलाच्या खालून ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्या संदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांचे अन्य साथीदारांची माहिती दिली. भुम पंचायत समितीतील रोहयो विभागातील कर्मचारी रवींद्र राख व कृष्णा बांगर यांची गाडी अडवून हल्ला केला होता. त्यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलिस ठाण्यात गुरन 290/2025 कलम 109 (1),115 (2), 118 (1) 351 (3),3 (5) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.
दोघे कर्मचारी काम आटोपून बोलेरो गाडीतून घराकडे निघाले होते. या दरम्यान काही अंतर दूर गेल्यानंतर इट आंदरूड रस्त्यावर बाईकवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांची गाडी रोखली होती. गाडी रोखल्यानंतर अज्ञातांनी काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडायला लावताच दोघांना बाहेर ओढून काढत लाठ्या काठ्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर रवी राख व कृष्णा बांगर हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले होते.