शिवसेनेचे आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांची तब्येत बरी असून ते घरीच उपचार घेत आहेत. कैलास पाटील यांना यापूर्वी गेल्या वर्षी पहिल्या लाटेत ऑक्टोबर महिन्यात कोरोना झाला होता मात्र त्यानंतर त्यांनी कोरोना काळात दिवसरात्र काम केले व जनतेची सेवा केली. कोरोना वॉर्डात जाऊन रुग्णाची विचारपूस करणे व आढावा घेणे ही कामे करताना त्यांना पुन्हा एकदा कोरोनाने गाठले. सर्दी व इतर लक्षणे असल्याने त्यांनी तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.
आमदार कैलास पाटील यांच्या सोबतच त्यांचे आई वडील पत्नी व मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. आई वडिलांवर डंबळ यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार कैलास पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याने एकदा कोरोना झाला तरी पुन्हा एकदा कोरोना होऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे लस घेतली किंवा कोरोना होऊन गेला तरी काळजी व उपाययोजना करणे गरजेचे आहे.