शालिनीताई मधुकरराव चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन , उद्या अणदूर येथे अंत्यसंस्कार
तुळजापूर – समय सारथी
महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या पत्नी शालिनीताई चव्हाण यांचे वृद्धापकाळाने पुणे येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले त्या 82 वर्षांच्या होत्या.
शालिनीताई चव्हाण दोन महिन्यापासून आजारी होत्या त्यांच्यावर वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये औषध उपचार सुरू होते पण वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती औषध उपचारास साथ देत नव्हती.
उपचार सुरू असतानाच आज रात्री साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्या अणदुर येथील शेतामध्ये करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील मालक चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव चव्हाण ही दोन मुलं आणि एक मुलगी यांच्यासह सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांनी अनेक आघाड्यावर चव्हाण यांना साथ दिली होती , त्या कार्यकर्ते यांची मुलांप्रमाणे अत्यंत आपुलकीने व आस्थेने चौकशी करीत काळजी घेत.