धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असुन प्रशासनाच्या अक्षम्य चुका झाल्या असुन हा प्रकार व्होट चोरी सारखा आहे, त्यामुळे दुबार व इतर ठिकाणी नोंद केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीत घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे सोमनाथ गुरव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अय्याज शेख,काँग्रेसचे अग्निवेश शिंदे, रोहित बागल उपस्थितीत होते.
2022 ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यावेळीच्या अंतीम मतदार यादीत व आताच्या प्रारूप यादीत खुप मोठा फरक आहे. मतदार संख्या वाढणे अपेक्षित असताना ती काही ठिकाणी कमी झाली आहे. काही ठिकाणी लोकसंख्या पेक्षा जास्त मतदार झाले आहेत ते आले कुठून असा सवाल केला. प्रभाग वॉर्ड रचना बदललेली नसताना मतदार वाढले आहेत, काही ठिकाणी नावे दुसऱ्या प्रभागात लावली गेली आहेत. 13 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप नोंदणी करण्याचा वेळ असुन तो कमी असुन तो वाढवावा अशी मागणी केली.
राज्य मार्ग, नदी, भौगोलीक रचना व बाकी निकष बाजूला ठेवून प्रभाग रचना केली आहे, याबाबत आक्षेप नोंद केले मात्र ते फेटाळून लावले. मतदार यादीवर आक्षेप दिल्यावर दुरुस्ती केली जाईल याची शास्वती प्रशासन देत नाही. जे मतदार ज्या भागात राहतात त्याच प्रभागात त्यांची नावे यादीत असावी अशी विनंती प्रशासनाला केली. मतदारांनी सुद्धा नावे आहेत का याची खात्री करावी अशी विनंती केली. नावे दुसरीकडे प्रभागात असतील तर आक्षेप नोंद करावा, स्वतः किंवा महाविकास आघाडी यांच्या कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
अनेक प्रभागात मतदार संख्या कोणतेही कारण नसताना कमी जास्त झाली आहे, हे चुकून झाले नसुन जाणीवपूर्वक केले आहे. या सगळ्या प्रकारामुळे अनेक मतदार यांना मतदान करता येणार नाही, ते वंचित राहतील. प्रशासनाने हे कोणाच्या तरी दबावाखाली हे केले असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने सक्षम वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यासाठी नेमवा तेच पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पडेल. आम्ही निवडणूक आयोग व न्यायालयात जाणार असल्याचेही ते म्हणाले.