उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याची सुसाईड नोटवरून समोर आले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत, घटनास्थळी 2 वेगवेगळ्या आत्महत्या चिट्ठी सापडल्या आहेत.ज्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलले तो उस्मानाबाद पोलीस दलात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पहिली सुसाईड नोट –
मी ………… मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे . याला जिम्मेदार हरिभाऊ रामदास कोळेकर असणार आहे. मी फाशी घेणार आहे, त्या कोळेकरच्या घरी कारण त्यानेच माझे वाटोळे केले. त्याने माझा पहिल्यांदा घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला सारखे धमकावत होता, बंदुकीचा धाक दाखवून , यात माझ्या नवऱ्याचा काय दोष नाही
दुसरी आत्महत्या चिट्टी –
मी ………………… वय 32 मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. याला जिम्मेदार फक्त हरिभाऊ रामदास कोळेकर आहे.त्याने माझ्यावर घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला धमकावू लागला , बंदुकीचा धाक दाखवत होता