वक्फ बोर्डाचे सर्व तहसीलदारांना पत्र – सात बारा उताऱ्यावरील नावे कमी करा
बॉण्डवर नोटरी करून इनामी जमिनीची विक्री – फेरफार रद्द करून वक्फची नोंद घ्या
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या ईनामी जमिनीवर सात बारा उताऱ्यात इतर हक्कात असलेल्या व्यक्तींची नावे कमी करून भोगवटदार रकान्यात देवस्थानचे नाव व इतर हक्कात वक्फ प्रतिबाधित सत्ता प्रकार अशी नोंद घेण्याचे पत्र जिल्हा वक्फ अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना दिले आहे. तलाठी यांनी नोंद घेऊन सात बारा व नमुना 3 ची नक्कल वक्फ मंडळास देण्यास सांगितले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक जमिनीवर वर्ग 2 ची नोंद झाल्यावर आता वक्फ बोर्ड सक्रिय झाले असून त्याच्या मालमत्तावर चुकीच्या नोंदी कमी करण्याचे पत्र दिले आहे. वक्फच्या इतर हक्कात असलेल्या नोंदी कमी न झाल्याने काही लोक आजही बॉण्डवर नोटरी करून इनामी जमिनीची विक्री करित असल्याचे वक्फने तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात म्हण्टले आहे.
वक्फच्या जमिनीवर नोंदी फेरफार घेण्यापूर्वी परवानगीची आवश्यकता आहे मात्र ती न घेता अनेक व्यवहार केले आहेत ते सर्व खरेदी विक्री व्यवहार रद्द बातल ठरतात असे पत्रात नमूद केले आहे. फेरफार व पोट हिस्सा करण्यापूर्वी वक्फची परवानगी घेतली नसून त्यावर ईनामदार लोकांची नावे घेतली असून त्यांनी बेकायदेशीरपणे या जमिनीची विक्री केली आहे ते सर्व फेर रद्द करावेत असे म्हण्टले आहे. वक्फ जमिनीत काही जण विनापरवाना जमीन व प्लॉट विक्री करित आहे त्यामुळे नागरिकांनी याबाबत खरेदी विक्री व्यवहार करू नये असे आवाहन जिल्हा वक्फ अधिकारी अहेमद खान यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील 120 गावात वक्फ बोर्डाची 8 हजार 743 एकर जमीन आहे यात सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यात 2 हजार 676 एकर यात, त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यात 2 हजार 596 एकर, परंडा 1 हजार 398,उमरगा 735, कळंब 581,भुम 493, लोहारा 139 व वाशी तालुक्यात 124 एकर जागा आहे. ही जमीन विविध दर्गा, मशीद, कब्रस्थान यासह अन्य संस्थांना विविध सेवा करण्यासाठी मुतवल्ली, मशायक, इनामदार,मुजावर,हिस्सेदार यांना सेवेसाठी देण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर,नळदुर्ग,ढोकी,उस्मानाबाद, परंडा, मुरूम,भूम येथे सर्वाधिक जमीन आहेत. तेर येथे 868 एकर,नळदुर्ग 830,मुरूम 513,परंडा शहर 643,उस्मानाबाद शहर 477,भूम शहरात 193, माणकेश्वर 290 अशी जमीन आहे. सर्वाधिक जमीन जामा मशीद यांची आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी व उस्मानाबाद शहरात वक्फ मंडळाची मोठया प्रमाणात जमीन असून उस्मानाबाद शहरातील मोक्याच्या जमिनी या विनापरवाना भाडेपट्ट्याने देण्यात आल्या असून अतिक्रमन केलेले आहे. ढोकी गावात जामा मशीद व कब्रस्थानची विविध 30 सर्व्ह नंबर मध्ये 673 एकर जमीन आहे व देवळाली येथे 94 एकर जमीन आहे तर एकट्या तेरमध्ये जामा मशीदची 460 व कबीरदास मठची 408 अशी या 2 संस्थानची सर्वाधिक 868 एकर जमीन आहे, जिल्ह्यात सर्वाधिक जमीन ही तेर गावात आहे. उस्मानाबाद शहरात हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी मशीद व कब्रस्थानची 265 एकर व जामा मशीद यांची 212 अशी उस्मानाबाद शहरात जवळपास 412 एकर जमीन आहे तर शहराशेजारी असलेल्या गडदेवधरी येथे मशीद व दर्गा शेख फरीद यांची 187 एकर जमीन,वाणेवाडी 67 एकर, कोळेवाडी 61, सारोळा येथे 50,काजळा 12, बेंबळी 24,दारफळ 14,कोंड येथे दर्गा मस्तान शहावली यांची 44 एकर जमीन आहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे 830 एकर जमीन आहे. काटी येथील जामा मशीद यांची 254 एकर,ईदगह यांची नळदुर्ग शहरात 155 एकर, आंदोरा 94, मुरूम येथे 214 अशी 462 एकर जमीन आहे.मशीद हस्तदीरा यांची नळदुर्ग शहरात 115 व मुरूम येथे 133 अशी 248 एकर जमीन आहे.सावरगाव येथे जामा मशीद यांची 199 एकर व दर्गा सिद्दी अंबर यांची 64 एकर, अपसिंगा 54, जळकोट 92,कुंभारी 23,मसाला 44,मंगरूळ 54, नळदुर्ग येथे जामा मशीद शाही यांची 278 तर जामा मशीद इनामदार गल्ली यांची 138, मशीद आसार शरीफ यांची 49, मशीद बाजार व कब्रस्थानची 83, उमरगा चिवरी येथे छोटी मशीद यांची 63 व जामा मशीदची 90 एकर जमीन आहे.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथे 513 एकर जमीन आहे. गुंजोटी येथे दर्गा हाजी मुन्नवर यांची 58 एकर, दर्गा हजरत राजा पाशा यांची 35,ईदगाहची 70 व दर्गा शरणशाहवली यांची 17 अशी गुंजोटी येथे 180 एकर जमीन आहे. कदेर येथे मकदुम अल्लाउद्दिन चिश्ती यांची 41 व दर्गा करीम साब यांची 38 अशी 79 एकर जमीन आहे. मुरूम येथे चिल्ला ह बंदे, जामा मशीद यांची 143 एकर जमीन आहे.तुरोरी येथे 28,तिक्रोळी येथे 32 हिप्परगा मशीद 34 एकर अशी जमीन आहे.
परंडा शहरात तब्बल 643 एकर जमीन वक्फ मंडळाची असून यात हजरत ख्वाजा बद्रोद्दीन यांची 171 एकर, छिल्ला ह गुलाम यांची 72,जामा मशीद कीला शमशीर मशीद यांची 173 एकर,मशीद कसबा मोहल्ला यांची सर्वाधिक 226 अशी एकूण शहारात जमीन आहे. आरणगाव येथे 55, देवळाली 89,घारगाव 44,जवळा 40, काद्राबाद 46, तांदुळवाडी व रोहकल 45,राजुरी 46 सह शिराळा येथे दर्गा पीर गैबी साहब यंची 105 एकर जमीन आहे.
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे दर्गा ख्वाजा नसिरोद्दीन यांची 169 एकर, आढाळा 88,खामसवाडी 35,मोहा येथे दर्गा सय्यद अलवी आशुरखान यांची 117 एकर,येरमाळा 20, रांजणी 20, हावरगाव 16, पिंपळगाव 20 एकर जमीन आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे दर्गा हजरत याकूब साहब यांची 75 एकर व इतर 10 अशी 86 एकर, पारगाव 16, सरमकुंडी 22 एकर जमीन आहे. लोहारा तालुक्यात खेड येथे 24,आष्टा 13,मार्डी 46,सास्तूर येथे 52 एकर जमीन आहे.
भूम तालुक्यात माणकेश्वर येथे सर्वाधिक 290 एकर जमीन असून यात दर्गा तय्यब उल कादरी यांची 119, मशीद उमर 12 व जामा मशीद यांची 159 एकर जमिनीचा समावेश आहे तर शेकापूर येथे 59 एकर, देवांग्रा 44,निपाणी 88 एकर,चिंचपूर 41 एकर तर भूम शहरात जामा मशीद यांची 193 एकर जमीन आहे.
मशायक,इनामदार,मुजावर,हिस्सेदार यांना सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. यात दर्गाह, मशीद यांची रोजची साफसफाई, दिवाबत्ती, वार्षिक उरूस, इतर कामे व धार्मिक कार्यक्रम आणि विधी करणे अपेक्षित आहे मात्र काही मोजक्या ठिकाणी या सेवा केल्या जातात. ईनामी जमिनीला कुळ, गहाणखत, खरेदी विक्री, दानपत्र करता येत नाही मात्र अनेक ठिकाणी या अटींचा शर्तभंग झाला आहे. शर्तभंग झाल्यावर वकफ अधिनियम 1995 चे कलम 51 प्रमाणे जमीन परत घेण्याची कारवाई होऊ शकते.वक्फ अधिनियम 1995 च्या कलम 51 नुसार हस्तातरन रद्द करीत कलम 52 नुसार जमीन परत घेण्याची कारवाई केली जाऊ शकते तर कलम 54 नुसार वक्फच्या मिळकतीवरील केलेले अतिक्रमण दूर करता येते.
उस्मानाबाद शहरातील हजरत खाजा शमशोद्दीन गाजी मशीद व कब्रस्थान यांचे सर्वे नंबर 246,284,285,355,356,427,428, 459,460,462,463 हे असून जामा मशीद यांचे 103,104,118,119,164,517,518, 519,520,521,760,761 व 762 आहेत. मशीद मुल्लायान यांचे 14,337 व 339 आहेत. या सर्व जमिनीवर इतर लोकांची नावे कमी करून वक्फची नावे लागणार आहेत.
============
जमीन घोटाळा – उस्मानाबाद शहरातील 3 हजार 220 एकर क्षेत्रावर वर्ग 2 ची नोंद
खिदमतमाश जमिनी धनदांडग्या व राजकीय नेत्यांनी लाटल्या – फौजदारी गुन्हे नोंद होणार
अनेक जमिनी रडारवर – वकफ जमिनीवर करोडोचे व्यवहार, कर्ज व अतिक्रमण
https://www.samaysarathi.com/2022/05/Land.html?m=1